चंदीगड विमानतळावर नेमके काय झाले ?

Foto

छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांनी सांगितली आपबिती
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): हैदराबादहून चंदीगडकडे येणाऱ्या इंडिगो विमानात मंगळवारी धक्कादायक घटना घडली. विमान सुरक्षितरीत्या लैंड झाल्यानंतर एका प्रवाशाच्या पॉवर बँकेचा अचानक स्फोट झाला आणि धूर पसरला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवाशांनी विमानातून उडी मारली. त्यात अनेकजण
जखमी झाले. यात छत्रपती संभाजीनगर येथील प्रवाशांचाही या विमानात समावेश होता. त्यात विमानात नेमके काय झाले याची आपबिती छत्रपती संभाजीनगरचे रोषण राजेंद्र छाजेड यांनी 'सांजवार्ता'शी
बोलताना सांगितली. इंडिगोच्या उड्डाणाने चंदीगड विमानतळावर लैंडिंग केल्यानंतर ही घटना घडली. एका प्रवाशाच्या पॉवर बँकेला अचानक आग
लागली. काही क्षणांतच धूर संपूर्ण केबिनमध्ये पसरल्याने प्रवासी घाबरले. स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानातील क्रूने तात्काळ आपत्कालीन प्रक्रिया राबवली. सर्व प्रवाशांना इमर्जन्सी स्लाइडच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. धूर निघाल्याने प्रवाशी घाबरले. त्यांनी तत्काळ विमानाबाहेर उडी मारल्या, त्यात १५ ते २० प्रवाशी जखमी झाले.
जवळपास १० प्रवाशी छत्रपती संभाजीनगर येथील होते. त्यांनी सांगितले की, अचानक धूर दिसू लागल्याने विमानात आग लागल्याची भीती निर्माण झाली. काही काळ गोंधळाचे वातावरण होते; मात्र विमान कर्मचाऱ्यांनी शांतपणे परिस्थिती हाताळत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा
यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. संबंधित पॉवर बैंक जप्त करण्यात आली असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
विमान कंपन्यांकडून प्रवाशांना वारंवार सूचना दिल्या जातात की, बॅटरी असलेली उपकरणे योग्य पद्धतीने हाताळावीत, अशा उपकरणांमुळे आगीचा धोका संभवत असल्याने विमान
सुरक्षित आहोत : रोषण छाजेड
कुटुंबीयासोबत छत्रपती संभाजीनगर येथून फिरण्यासाठी गेलो. छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद आणि हैदराबादहून चंदीगड असा प्रवास करत असताना चंदीगड येथील विमानात पॉवर बँकेचा स्फोट झाला. यात जवळपास दोनशे प्रवाशी होते. छत्रपती संभाजीनगर येथील देखील प्रवाशी कामानिमित्त याच विमानाने प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत सगळेजण सुरक्षित आहे. मात्र दोनशे लोकांच्या सह्या घेऊन इंडिगोला तशी तक्रार देखील केली आहे. अशा घटना घडू नये यासाठी लक्ष ठेवले पाहिजे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करू नये यासाठी विषेश काळजी घ्यावी, असेही रोषण छाजेड यांनी सांगितले.
प्रवासादरम्यान विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला असून सर्व
प्रवासी सुरक्षित आहेत. मात्र या प्रकारामुळे विमान प्रवासातील सुरक्षा उपायांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Powere